प्रति,
विद्यार्थी / पालक,

लहानपणी दिवाळीची सुट्टी आली की दिवाळीचा असलेला भरपूर अभ्यास आठवतो. पाठ्य अभ्यास सोडला तर वहीची सजावट करणे, हस्तकाम करणे या उपक्रमांमध्ये खूप मज्जा यायची. काहीजण अगदी आवडीने, काहीजण कंटाळत तर काही दुसऱ्याची वही घेऊन अभ्यास पूर्ण करत.

यावर्षी मात्र सगळं स्क्रीनवर, ऑनलाईन आणि व्हर्च्युअल. अशा वेळी ऑफ स्क्रीन काही गंमत करता आली तर, मुलांच्या हाताला काही काम मिळालं आणि आपल्याही कौशल्याला पुन्हा संधी मिळाली तर त्यातून काही सुंदर कलाकृती नक्कीच साकार होईल. त्यातला स्वनिर्मितीचा आनंद काही निराळाच.

पण साहित्य कोण जमवणार ते कापणार कोण, आत्ता नेमकी कृती आठवत नाही असे प्रश्न समोर येतातच.

मुलांच्या व पालकांच्या दिवाळीतल्या स्वनिर्मितीच्या आनंदाला द्विगुणित करण्यासाठी आम्ही दिवाळी डेकोरेशन किट तयार केले आहे. यातील साहित्यातून

1) एक आकाश कंदील,
2) एक डिझाईनर कंदील,
3) तोरण,
4) अँक्रलीकची रांगोळी ,
5) 2 पणत्या, (दिया पेंटिंग),
6) पणती टेन्सिल वापरून डिझाईन बनवणे
6 प्रकार आपण बनवू शकता. सोबत कृतीचे मॅन्युअल सुध्दा मदतीला असणार आहे.

तुमच्या संपर्कातील जास्तीत जास्त मुलांना हा स्वनिर्मितीचा आनंद देऊ शकता, दिवाळी सजावट संच भेट देऊन किंवा स्वतःसाठी घेऊन. अगदी महाराष्ट्रात कुठेही.

ग्रुपमध्ये नोंदणी केल्यास मार्गदर्शनसाठी मोफत ऑनलाईन कार्यशाळा ठरवता येईल किंवा व्हीडीओ शेअर करता येईल.

प्रशांत शेलार, दीप्ती शेलार
पूर्णांक ऍक्टिव्हिटी सेंटर,
माध्यम क्रिएशन्स,
9821744190
9594229191